
Description
राज्यसेवा मुख्यपरीक्षेमध्ये वैकल्पिक विषयाला अनन्यसाधारण महत्व आहे. 1750 मार्कांसाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये एकटा वैकल्पिक विषय 500 मार्कांसाठी आहे.
♦ भूगोल वैकल्पिक विषयाचे महत्त्व -
- संकल्पनांवर अवलंबून विषय असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय.
- हमखास मार्क्स मिळवून देणारा विषय.
- सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3 तसेच निबंध पेपर मध्ये या विषयाचा प्रत्यक्ष संदर्भ आहे.
♦ कोर्सची वैशिष्ट्ये -
- या कोर्स मध्ये भूगोल वैकल्पिक विषय अत्यंत सखोल पद्धतीने घेतला जाणार आहे.
- भूगोलातील परीक्षेसाठी उपयुक्त सर्व संकल्पना, सिद्धांत व आकडेवारी क्लास मध्येच घेतली जाणार आहे.
- वैकल्पिक विषयाची तयारी करताना च विद्यार्थ्यांना पेपर 1 मधील भूगोल व सामाजिक मुद्दे, पेपर 2 मधील सामाजिक मुद्दे, पेपर 3 मधील भूगोलाशी संबंधित अर्थव्यवस्था विषयाचा भाग या घटकांमध्ये देखील फायदा होईल.
